18 April 2025 7:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

BEL Share Price | डिफेन्स कंपनी BEL शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: BEL

BEL Share Price

BEL Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सध्या हा शेअर 280 रुपयांवर ट्रेड करत आहे. दरम्यान, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. सध्या, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर त्याच्या उच्चांकी पातळीवरून २० टक्क्यांनी घसरला आहे. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर 1.30 टक्क्यांनी वाढून 279.75 रुपयांवर पोहोचला होता.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मचा रिपोर्ट जारी

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. डिफेन्स क्षेत्रातील ही एक दिग्गज कंपनी असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे. येत्या काळात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला QRSAM, MRSAM आणि Tejas Mk1A साठी मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतील असा अंदाज ब्रोकरेजने व्यक्त केला आहे. शिवाय, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी नॉन-डिफेन्स रेव्हेन्यू आणि एक्सपोर्ट वाढवण्यावरही भर देत आहे असं ब्रोकरेजने म्हटलं आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची दमदार ऑर्डरबुक

1 ऑक्टोबर 2024 पर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे ऑर्डरबुक 74,595 कोटी रुपये होती. त्यांनतर सुद्धा कंपनीला अनेक नवीन कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला १०,३६२ कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत.

विशेष म्हणजे येत्या काळात केवळ QRSAM या क्विक रिऍक्शन सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्रासाठी २५ ते ३० हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात, असा कंपनीचा अंदाज आहे. तसेच आर्थिक वर्ष 2025 साठी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने 25,000 कोटी रुपयांचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर टार्गेट प्राईस

डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा मार्केट हिस्सा ६० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे शेअरबाबत तज्ज्ञांचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअरसाठी तज्ज्ञांनी ३६० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ही टार्गेट प्राईस शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा 30 टक्क्यांनी अधिक आहे. जुलै २०२४ मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर ३४० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर शेअर 13 जानेवारी 2025 रोजी 258 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price Friday 17 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BEL Share Price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या