14 January 2025 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

BEL Share Price | संधी सोडू नका! PSU BEL शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 19 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह (NSE:BEL) ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक किंचित वाढला आहे. बीईएल कंपनीचे (NSE: BEL) एकूण बाजार भांडवल 2,21,888.34 कोटी रुपये आहे. मागील काही दिवसांपासून बीईएल स्टॉक 300 रुपयेच्या आसपास ट्रेड करत आहे. 10 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 340.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. ( बीईएल कंपनी अंश )

आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.20 टक्के वाढीसह 302.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 135.9 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीचे शेअर्स 848 टक्के वाढले आहेत. 1 जानेवारी 1999 रोजी बीईएल स्टॉक 0.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आता हा स्टॉक 300 रुपये किमतीवर पोहचला आहे.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांनी बीईएल स्टॉक 296 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 317 रुपये किमतीवर जाऊ शकतो. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, बीईएल स्टॉक पुढील काळात 350 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 280 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

14 ऑगस्ट रोजी बीईएल स्टॉक एक्स-डिव्हिडंड म्हणून व्यवहार करत होता. या दिवशी कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 0.80 रुपये लाभांश वाटप केला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एकूण 2.2 रुपये लाभांश वाटप केला आहे. 2017 मध्ये बीईएल कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित केले होते. तसेच 2015 पासून आतापर्यंत या कंपनीने आपल्या शेअरधारकांना तीन वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे.

सप्टेंबर 2015 मध्ये बीईएल कंपनीने गुंतवणुकदारांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. तर सप्टेंबर 2017 आणि 2022 मध्ये या कंपनीने गुंतवणुकदारांना अनुक्रमे 1:10 आणि 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स इश्यू केले होते. जून तिमाहीत बीईएल कंपनीने एकूण 776.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 530.84 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीचा निव्वळ नफा 46 टक्के वाढला आहे.

जून तिमाहीत बीईएल कंपनीचा महसूल 19.6 टक्के वाढून 4,198.77 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 3,510.84 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2024-25 च्या जून तिमाहीत बीईएल कंपनीने एकूण 4105.14 कोटी रुपयेची उलाढाल केली होती. मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 3,446.69 कोटी रुपयेचा व्यापार केला होता. 1 जुलै 2024 पर्यंत कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 76,705 कोटी रुपये आहे. 19 ऑगस्ट रोजी शेअर बाजारातील तज्ञांनी बीईएल स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली होती.

News Title | BEL Share Price NSE: BEL 20 August 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x