19 April 2025 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

BEL Share Price | BEL शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, स्टॉक प्राईस 364 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षात 145 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. जून तिमाहीत या सरकारी कंपनीने निव्वळ नफ्यात 46.1 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 531 कोटी रुपये नफा कमावला होता, तर जून 2024 तिमाहीत कंपनीने 776 कोटी रुपये नफा कमावला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )

जून 2024 तिमाहीत बीईएल कंपनीचे उत्पन्न 19.6 टक्क्याच्या वाढीसह 4,199 कोटी रुपयेवर पोहचले होते. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 3,511 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. शुक्रवार दिनांक शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी बीईएल स्टॉक 2.57 टक्के घसरणीसह 303.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

बीईएल कंपनीचा EBITDA 665 कोटी रुपयेवरून 41 टक्के वाढून 937 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या कंपनीचा EBITDA मार्जिन 19 टक्क्यांवरून वाढून 22.3 टक्क्यांवर पोहचला आहे. जून 2024 तिमाहीत बीईएल कंपनीने 4,105.14 कोटी रुपयेची उलाढाल केली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीची उलाढाल 3,446.69 कोटी रुपये होती. 1 जुलै 2024 पर्यंत बीईएल कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार 76,705 कोटी रुपये होता.

जून 2024 मध्ये बीईएल स्टॉक 3.3 टक्के, मे 2024 मध्ये 26.6 टक्के आणि एप्रिल 2024 मध्ये 16 टक्के वाढला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये बीईएल स्टॉकमध्ये 10 टक्के आणि जानेवारीमध्ये 1 टक्के वाढ पहायला मिळाली होती. मार्च 2024 मध्ये बीईएल स्टॉक 2 टक्क्यांनी घसरला होता. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 864 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

बीईएल स्टॉक आपल्या 10 दिवस आणि 50 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मात्र 20 दिवसांच्या DMA च्या खाली ट्रेड करत आहे. या स्टॉकचा RSI 53 वर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही. या स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 306 रुपये ते 326 रुपये दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने बीईएल स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग देऊन 364 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. UBS फर्मने या स्टॉकवर न्यूट्रल रेटिंग जाहीर करून 340 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मॉर्गन स्टॅन्ले फर्म बीईएल कंपनीच्या भविष्यातील व्यवसाय कामगिरीबाबत आशावादी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 03 August 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BEL Share Price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या