20 September 2024 5:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | शेअर प्राईस 44 रुपये, 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News
x

BEL Share Price | तज्ज्ञांकडून मल्टिबॅगर BEL शेअरची रेटिंग अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL?

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बँक ऑफ अमेरिकन कॉर्पोरेशनने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ अशी अपडेट केली आहे. ( बीईएल कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, या सरकारी कंपनीचे शेअर्स 40 टक्के खाली येऊ शकतात. BoFA च्या मते, हा स्टॉक पुढील काळात 213 रुपये किमतीवर येऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी बीईएल स्टॉक 1.29 टक्के वाढीसह 302.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बीईएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.12 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये आहे. या सरकारी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 340.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 125.50 रुपये होती. बीईएल स्टॉक BSE-100 इंडेक्सचा घटक आहे. मागील सहा महिन्यात बीईएल स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 60.97 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक BSE औद्योगिक निर्देशांकापेक्षा चांगली कामगिरी करत आहे. हा इंडेक्स याच कालावधीत फक्त 27 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात बीईएल स्टॉक 128 टक्के आणि तीन वर्षात 395 टक्के मजबूत झाला आहे.

जून तिमाहीत बीईएल कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 20.1 टक्के वाढून 4,244 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 3,533 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून तिमाहीत बीईएल कंपनीचा PAT वार्षिक आधारावर 46.9 टक्के वाढून 791 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण 539 कोटी रुपये होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 3.21 टक्के वाढीसह 291.60 रुपये किमतीवर ओपन झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 09 August 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x