18 November 2024 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

BEL Share Price | 20 रुपयाच्या शेअरने कमी कालावधीत 900 टक्के परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत, खरेदी करणार?

BEL Share Price

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांच्या वाढीसह 190 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.4 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 196 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 90 रुपये होती. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के घसरणीसह 189.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 दिवसांत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 47 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 95 रुपये किमतीवरून 100 टक्के वाढले आहेत.

22 फेब्रुवारी 2019 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 26 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 8 मे 2020 रोजी या म्हणजेच कोरोना काळात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किंमत पातळीवरून शेअर्सची किंमत 900 टक्के वाढली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 91000 कोटी रुपये आहे. नुकताच भारतीय नौदलाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला 2167 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला ऑन-बोर्ड युद्धनौकेसाठी EWS संचाची रचना करण्याचे काम देण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत उपक्रमानुसार EWS संच निर्मिती हा खूप महत्त्वाचा कार्यक्रम असेल. याशिवाय, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला एसडीआर, एचडी, व्हीएफ रिसीव्हर आणि ईव्हीएम संबंधित 115 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.

चालू आर्थिक वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने तब्बल 30776 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळवल्या आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी भारतीय इलेक्ट्रॉनिक अँड असोसिएटेड इंडस्ट्रीज सोबत काम करते. देशातील अनेक एमएसएमई उद्योग भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीसाठी उपविक्रेते म्हणून काम करत आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची स्थापना 1954 साली झाली होती. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः संरक्षण क्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने भरघोस लाभांश वाटप केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 21 February 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x