15 January 2025 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

BEL Share Price | PSU शेअर पुढेही मालामाल करणार, यापूर्वी 15,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर दिला 1.58 कोटी रुपये परतावा

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित खरेदी पाहायला आहे. आज भारतीय शेअर बाजार देखील किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. काही निर्देशांक अस्थिर असून सध्या हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )

आज सकाळी बीईएल स्टॉक 236 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर हा स्टॉक 236.15 रुपये किमतीवरून खाली आला. आज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.11 टक्के वाढीसह 233.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बीईएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.70 लाख कोटी रुपये आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर 2024 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शेअर्सपैकी एक आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18.4 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात देखील बीईएल कंपनीच्या शेअर्सने चांगली कामगिरी केली आहे.

2024 या वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यांत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित करण्यात आले होते. या कंपनीने आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना पाच वेळा मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत.

मागील 25 वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 30 पैशांवरून वाढून 238 रुपये किमतीवर पोहचले होते. जर तुम्ही 25 वर्षांपूर्वी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 15,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.58 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 22 April 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(101)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x