26 April 2025 8:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल
x

BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL

BEL Share Price

BEL Share Price | मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. येत्या काळात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर प्राईस तेजीने वाढेल असं ब्रोकरेजने म्हटलं आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरसाठी 360 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ब्रोकरेजच्या मते हा डिफेन्स कंपनी शेअर सध्याच्या पातळीपासून २७.५ टक्क्यांनी वाढू शकतो. ब्रोकरेजने भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरसाठी ‘बाय’ कॉल दिला आहे.

ब्रोकरेज हाऊसने काय म्हटले आहे?

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने डिफेन्स कंपनीबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे. त्या रिपोर्टमध्ये ब्रोकरेजने म्हटले आहे की, ‘पुढील १ ते ३ वर्षांत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला अनेक मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी कॉण्ट्रॅक्ट मिळू शकतात. ऑर्डरबुक अजून मजबूत होऊन कंपनीला मोठा फायदा होईल. येत्या काळात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा बाजारातील एकूण हिस्सा देखील वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. डिफेन्स क्षेत्राच्या वाढीपेक्षाही भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अधिक वेगाने वाढेल असं मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी ही डिफेन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. डिफेन्स क्षेत्रात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा एकूण ६० टक्के बाजार हिस्सा आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने डिफेन्स बाजारपेठेत आपलं उत्पन्न सातत्याने वाढवलं आहे.

दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने २५० अब्ज रुपयांच्या वर्क-ऑर्डरचे लक्ष्य ठेवले होते. आजपर्यंत, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने १०० अब्ज रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केले आहेत. तसेच शेवटच्या तिमाहीपर्यंत कंपनी १५० अब्ज रुपयांचे उर्वरित कॉन्ट्रॅक्ट काम पूर्ण करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price Saturday 18 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BEL Share Price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony