13 January 2025 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • BEL Vs HAL Share Price
  • HAL शेअर उच्चांकी पातळीपासून 23 टक्क्यांनी खाली
  • BEL शेअर टार्गेट प्राईस – NSE: BEL
  • HAL शेअर टार्गेट प्राईस – NSE: HAL
BEL Vs HAL Share Price

BEL Vs HAL Share Price | सध्या भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचला आहे. निफ्टी इंडेक्स 26000 अंकावर पोहचला होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स 25939 अंकावर क्लोज झाला होता. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात लक्षणीय घसरण पाहायला मिळाली होती.

डिफेन्स सेक्टरमधील शेअर्स 25 ते 35 टक्क्यांनी घसरले होते. आता अमेरिकन फेडची भूमिका स्पष्ट झाल्याने भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारातील काही डिफेन्स स्टॉक तेजीत आले आहेत. यापैकी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय उलाढाल पाहायला मिळत आहे.

HAL शेअर उच्चांकी पातळीपासून 23 टक्क्यांनी खाली
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 2.50 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर 3.30 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. सध्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5674.75 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 23 टक्क्यांनी खाली आले आहेत. तर बीईएल कंपनीचे शेअर्स 340.50 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 18 टक्के खाली आले आहेत.

आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 289.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 0.20 टक्के वाढीसह 4,411.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

BEL शेअर टार्गेट प्राईस
बीईएल कंपनीच्या शेअर्सने 290 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. मागील दोन ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सला सध्या 290 रुपये ते 300 रुपये दरम्यान प्रतिरोध मिळत आहे. जर हा स्टॉक प्रतिरोध पातळीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 320 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

HAL शेअर टार्गेट प्राईस
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने अवघ्या दोन दिवसांत 4174 रुपये वरून 4465 रुपयेपर्यंत झेप घेतली आहे. या स्टॉकला 4670 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक प्रतिकार पातळीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 4900 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Vs HAL Share Price 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Vs HAL Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x