5 November 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

Bharat Bandh | शेतकरी आंदोलकांच्या उद्याच्या भारत बंदला विरोधी पक्षांचा एकमुखी पाठिंबा

Bharat Bandh

नवी दिल्ली, २६ सप्टेंबर | केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने उद्या (२७ सप्टेंबर) भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे धसत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सगळीकडून प्रयत्न होत असताना शेतकरी आंदोलकांनी भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे त्याला सर्वसामान्य जनतेकडून कितपत प्रतिसाद मिळेल याविषयीच मूळात शंका आहे.

Bharat Bandh call signals growing farmer worker unity :

त्यातही या आंदोलनाचे पुरते राजकीयीकरण विरोधी पक्षांनी केले असून उद्याचा बंद यशस्वी झाला तरी त्याचा फायदा शेतकरी आंदोलकांना होणार की विरोधी पक्षांना होणार?,हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. काँग्रेससह समाजवादी पक्ष, राजद, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलगू देशम, वायएसआर काँग्रेस, डीएमके, बहुजन समाज पक्ष, अकाली दल टीआरएस आदी पक्षांनी आपापल्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांचा बंद यशस्वी करून दाखवण्याचा चंग बांधला आहे.

कारण ती त्यांची भाजपा विरोधातली राजकीय गरज आहे. अशा स्थितीत भाजप आणि एनडीएमध्ये उरलेले घटक पक्ष या बंद संदर्भात नेमके कसे धोरण आखतात आणि त्यावर कशी मात करतात?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शिवाय आज विरोधकांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये त्या पक्षांनी कृषी कायद्यांविरोधात विधानसभांमध्ये ठराव मंजूर करून घेतले हे खरे. परंतु, घटनात्मक दृष्ट्या त्यांना केंद्रातल्या कृषी कायद्यांच्या विरोधात राज्यांचे कृषी कायदे करता येत नाहीत. त्यामुळे त्यांना गप्प बसावे लागले आहे.

Bharat Bandh on 27 September Bank union to join strike :

अर्थात हेच विरोधी पक्ष केंद्रात एकत्र येऊन सत्तेवर आले तर आत्ता लागू केलेले कृषी कायदे पूर्णपणे बदलण्याचे आश्वासन ते शेतकऱ्यांना देण्याचे टाळत आहेत. कारण त्यातल्या व्यावहारिक अडचणी त्यांना माहिती आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा राजकीय फायदा उपटण्याच्या पलीकडे विरोधी पक्षांचा स्वार्थ यापेक्षा यात दुसरे काही दिसत नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Bharat Bandh unilateral support of opposition parties for tomorrows farmers agitators.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x