18 November 2024 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

Bharat Electronics Share Price | सरकारी कंपनी लाभांश वाटप करणार, रेकॉर्ड तारीखपूर्वी स्टॉक घेऊन लाभांश मिळवा, रेकॉर्ड डेट पहा

Bharat Electronics Share Price

Bharat Electronics Share Price | संरक्षण क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ या प्रमुख सरकारी कंपनीने आर्थिक वर्ष 2023 साठी दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी दिनांक 17 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. BEL कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2022-23 साठी 60 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील 5 वर्षात या लार्ज कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 35 टक्क्यांनी वाढली आहे.

लाभांश रेकॉर्ड तारीख :
BEL कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 60 पैसे प्रति इक्विटी शेअर दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनी शेअरच्या दर्शनी मूल्यावर आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्के अंतरिम लाभांश देणार आहे. ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ कंपनीने अंतरिम लाभांशाची एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट म्हणून 25 मार्च 2023 हा दिवस निश्चित केला आहे. हा लाभांश घोषणेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केला जाईल. मागील वर्षी कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देखील वाटप केले होते.

शेअरची कामगिरी :
‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही मागील 5 वर्षांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या काळात BEL कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 101 टक्के परतावा कमावला आहे. 23 मार्च 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 46.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 मार्च 2023 रोजी स्टॉक हा स्टॉक 0.64 टक्के घसरणीसह 92.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या वर्षी आतापर्यंत, BEL कंपनीच्या स्टॉकने लोकांना 6 टक्क्यांहून अधिक नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका वर्षात हा स्टॉकची किंमत 34 टक्क्यांनी वाढली आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी BEL कंपनीचे शेअर्स 115 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी, 28 मार्च 2022 रोजी, या कंपनीचे शेअर्स 67.82 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bharat Electronics Share Price 500049 on 20 March 2023.

हॅशटॅग्स

Bharat Electronics Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x