26 April 2025 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल
x

Bharat Electronics Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरने दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती केले, तपशील नोट करा

Bharat Electronics Share Price

Bharat Electronics Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 33 टक्के वाढ होऊन देखील कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने 812.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह 131.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के घसरणीसह 132.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल वाढीव असून देखील कंपनीचे शेअर्स आज घसरले आहेत. ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरवर सध्याच्या किमतीपेक्षा 14 टक्के जास्त लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. 25 ऑक्टोबर 2001 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 66 पैशांवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे शेअर्स 132 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

22 वर्षापुर्वी ज्या लोकांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरमध्ये 50 हजार रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य करोडो रुपये झाले आहे. 30 जानेवारी 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 87 रुपये या वार्षिक नीचांक किमती पातळीवर पोहोचले होते. यानंतर अवघ्या आठ महिन्यांत भारत इलेक्ट्रॉनिक्स स्टॉक 69 टक्के वाढला आहे.

11 सप्टेंबर 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 147.20 रुपये या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. सप्टेंबर 2023 तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा EBITDA वार्षिक 22 टक्क्यांच्या वाढीसह 1010 रुपयेवर पोहोचला होता. आता कंपनीचा EBITDA मार्जिन 3.38 टक्क्यांनी वाढून 25.3 टक्केवर पोहचला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 68.7 हजार कोटी रुपये आहे.

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या व्यापारावर इस्रायल-हमास युद्धाचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आर्थिक वर्ष 2024 च्या उत्तरार्धात कंपनीचा व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा EBIDA वार्षिक आधारावर 13 टक्के वाढू शकतो.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला 15.4 हजार कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या. म्हणून ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरवर 150 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bharat Electronics Share Price NSE 01 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bharat Electronics Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony