31 January 2025 11:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Slab | पगारदारांनो, स्टँडर्ड डिडक्शनसह इन्कम टॅक्सशी संबंधित 'या' 3 मर्यादेत वाढ केली जाऊ शकते Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कोटक सिक्युरिटीज ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार हा रेल्वे शेअर, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा - NSE: IRFC SBI Saving Account | SBI बँक ग्राहकांसाठी खशखबर, मिनिमम बॅलेन्सच्या सुविधेसह 'या' गोष्टी मिळतील मोफत Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर खरेदीसाठी झुंबड, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN HUDCO Share Price | मालामाल करणार हा मल्टिबॅगर PSU शेअर, मिळेल मजबूत परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर मालामाल करणार, गुंतवणूकदार तुटून पडले, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

BHEL Share Price | सरकारी कंपनीचा BHEL शेअर तुफान तेजीत येणार, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर

BHEL Share Price

BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 269.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.04 टक्के घसरणीसह 259.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच एनटीपीसी कंपनीने सिंगरौली सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचा विकास करण्यासाठी 17195 कोटी रुपये गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या टेंडरमधे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही सरकारी कंपनी एकमेव बोलीदार होती. त्यामुळे BHEL कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. या प्रकल्पाची क्षमता 2×800 मेगावॅट असेल. NTPC कंपनीने दिलेल्या गुंतवणुकीच्या मान्यतेमुळे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला मोठा फायदा होणार आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुढील काळात 300 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 2024 च्या आर्थिक वर्षात कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 65,000 कोटी रुपयेपर्यंत वाढू शकतो. अनेक म्युच्युअल फंडांनी देखील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक केली आहे.

जून 2022 तिमाहीच्या शेवटी देशातील म्युच्युअल फंडांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे 1.5 टक्के भाग भांडवल धारण केले होते. डिसेंबर 2023 तिमाहीच्या अखेरीस हे प्रमाण 6.27 टक्क्यांवर पोहोचले होते. मागील एका वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 257 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 74.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 269.35 रुपये किमतीवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 05 March 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x