5 November 2024 3:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

BHEL Share Price | PSU स्टॉक मालामाल करणार, फायद्याची अपडेट येताच गुंतवणूकदार खरेदीसाठी तुटून पडले

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स तुफान वेगात वाढत आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 255.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर गुरुवारी बीएचईएल स्टॉक 13 टक्के वाढीसह 289 रुपये किमतीवर पोहचला होता. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे.

या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. अदानी पॉवर कंपनीने बीएचईएल कंपनीला 3500 कोटी रुपये मूल्याची एक मोठी ऑर्डर दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 1.10 टक्के वाढीसह 281 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बीएचईएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 322.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 83.10 रुपये होती. बीएचईएल कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, कंपनीला रायपूर, छत्तीसगड येथे 2X800 मेगावॅट क्षमतेचा थर्मल पॉवर प्लांट स्थापन करण्याची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने दिली आहे. या ऑर्डरचे मूल्य 3500 कोटींपेक्षा जास्त आहे.

या ऑर्डर अंतर्गत बीएचईएल कंपनीला बॉयलर, टर्बाइन, जनरेटरसह आवश्यक उपकरणे पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह बीएचईएल कंपनीवर सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बीएचईएल कंपनी आपल्या त्रिची आणि हरिद्वारस्थित प्लांटमध्ये बॉयलर आणि जनरेटर बनवणार आहे.

6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 83.76 रुपये किमतींवर ट्रेड करत होते. तर 6 जून 2024 रोजी हा स्टॉक 289 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 245 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी बीएचईएल स्टॉक 178.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आता हा स्टॉक 280 रुपये किमतीच्या पार गेला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात बीएचईएल स्टॉक तब्बल 47 टक्के वाढला आहे. 1 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 198.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 07 June 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x