15 January 2025 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

BHEL Share Price | PSU BHEL शेअर शॉर्ट टर्म मध्ये देणार मोठा परतावा, ही आहे पुढची टार्गेट प्राइस

BHEL Share Price

BHEL Share Price | भारतीय शेअर बाजारातील तेजी पाहून अनेक तज्ञ आणि गुंतवणुकदार उत्साही भावना व्यक्त आहेत. तज्ञांच्या मते, 2024 हे वर्ष देखील गुंतवणूकदारांसाठी कमाईच्या बाबतीत लक्षणीय ठरणार आहे. अशा काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने महारत्न दर्जा असलेला बीएचईएल स्टॉक निवडला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकमध्ये 2-3 दिवसांसाठी पोझिशन घेण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, पुढील दोन ते तीन दिवसात या सरकारी स्टॉकमध्ये जोरदार ॲक्शन पाहायला मिळू शकते. ( बीएचईएल कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी नुकताच आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये तज्ञांनी सरकारी स्टॉकबाबत सखोल विश्लेषण केले आहेत. तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी अधिक आकर्षक वाटत आहे. महारत्न दर्जा असलेल्या बीएचईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स पुढील 2-3 दिवसांत 350 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

11 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 332 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 1.88 टक्के घसरणीसह 326.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 2-3 दिवसात 5-6 टक्के नफा सहज मिळू शकतो.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात अस्थिरता असताना बीएचईएल स्टॉक 1.5 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदाराना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 68 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात बीएचईएल स्टॉक तब्बल 67 टक्के वाढला आहे.

मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्के आणि 1 महिन्यात 12 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 335.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 91.05 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.15 लाख कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 12 July 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x