9 November 2024 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 68 पैशाचा शेअर धुमाकूळ घालणार, एका वडापावच्या किंमतीत 30 शेअर्स येतील, मोठी कमाई होईल - BOM: 539217 Penny Stocks | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, संधी सोडू नका, झटपट 143% परतावा दिला - BOM: 524444 त्यांचं ते जनाब, आपलं जनाब ते कुछ भी अनाब शनाब, क्या सही कहा ना जनाब, भाजपा-प्रेमी राज ठाकरेंची पोलखोल CIBIL Score | नोकरदारांनो, 'या' 4 प्रकारे झटपट वाढेल तुमचा सिबिल स्कोअर, पटापट मंजूर होईल पगारदारांचं कर्ज - Marathi News SBI Mutual Fund | SBI बँक FD विसरा, SBI म्युच्युअल फंडाच्या या 5 योजना वर्षाला 63% पर्यंत परतावा देतील - Marathi News Vodafone Idea Share Price | पेनी शेअर नीचांकी किंमतीजवळ आला, पुढे काय करावं, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA NPS Calculator | पगारदारांनो, महागाई प्रचंड वाढतेय, महिना 1.5 लाख रुपये पेन्शन हवी असल्यास NPS मध्ये किती बचत करावी
x

BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. नुकताच या कंपनीला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यात 2×800 MW क्षमतेचे कोडरमा फेज-॥ थर्मल पॉवर स्टेशन स्थापित करण्यासाठी 10,000 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट दिले आहे. बीएचईएल कंपनीला या ऑर्डरची पूर्तता पुढील 52 महिन्यांत करायची आहे.

या प्रकल्पामध्ये मुख्यतः बॉयलर, टर्बाइन, जनरेटर आणि संबंधित उपकरणे, तसेच इलेक्ट्रिकल आणि कंट्रोल आणि इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम आणि उर्वरित प्लांट पॅकेज साधनांचा पुरवठा करण्याचे काम सामील आहे. वीज केंद्रासाठी आवश्यक बांधकाम आणि नागरी कामांची जबाबदारी देखील बीएचईएल कंपनीला देण्यात आली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही बातमी येताच बीएचईएल स्टॉक सोमवारी 2 टक्के वाढीसह 327 रुपये किमतीवर पोहचला होता.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 211 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात बीएचईएल स्टॉक आतापर्यंत 64 टक्के वाढला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्के नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 0.42 टक्के वाढीसह 324.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी बीएचईएल स्टॉक 1.96 टक्के वाढीसह 317.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. दिवसभरात या कंपनीचे 6 लाख शेअर्स ट्रेड झाले होते, ज्याचे एकूण मूल्य 18.91 कोटी रुपये होते. 7 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 94.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 9 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 335.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता.

बीएचईएल स्टॉकचा बीटा 1.6 आहे, जो वर्षभरातील उच्च अस्थिरता दर्शवतो. या स्टॉकचा RSI 55.3 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. बीएचईएल स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA किमतीच्या वर ट्रेड करत आहे. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.10 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 30 July 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x