25 December 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

BHEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर्समध्ये तुफान तेजी, एका दिवसात 13 टक्के परतावा, का खरेदी वाढतेय?

BHEL Share Price

BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अफाट तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 13 टक्के वाढीसह 135.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी या सरकारी कंपनीचे शेअर्स आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला एनटीपीसी कंपनीकडून एक मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे गुंतवणुकदारांनी भेल कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आहे.

या नवीन ऑर्डरनूसार BHEL कंपनीला छत्तीसगड राज्यातील लारा या ठिकाणी 2×800 MW क्षमतेचा सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले आहेत. भेल कंपनी सरकारी मालकीची महारत्न दर्जा असलेली कंपनी आहे. शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.75 टक्के वाढीसह 135.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ब्रोकरेज हाऊसने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि तज्ञांनी या शेअर्सवर 158 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. BHEL कंपनीला NTPC कडून जी ऑर्डर मिळाली आहे, त्याचे मूल्य 11000-12000 कोटी रुपये दरम्यान आहे.

ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, आणि तज्ञांनी स्टॉकवर 158 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की, आर्थिक वर्ष 2024-26 मध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 60,000 कोटी रुपयेच्या पार जाऊ शकतो.

मागील 5 महिन्यांत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 97 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 68.07 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी हा स्टॉक 135.95 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 126 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 60.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि 12 महिन्यांनंतर हा स्टॉक 135.95 रुपये किमतीवर पोहोचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price today on 02 September 2023.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x