19 April 2025 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

बँक खात्यात चुकून ५ लाख रुपये आले | पैसे मोदींनी दिल्याचं सांगत परत करण्यास नकार | पोलिसांकडून अटक

PM Narendra Modi

पाटणा, १४ सप्टेंबर | बिहारमध्ये बँकेच्या चुकीमुळे एका व्यक्तीच्या खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाले. पण हे पैसे परत करण्यास तो तयार नव्हता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि आता तो तुरुंगात आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पैसे त्याच्या खात्यावर पाठवले आहेत, मग मी का परत करावे?

बँक खात्यात चुकून ५ लाख रुपये आले, पैसे मोदींनी दिल्याचं सांगत परत करण्यास नकार, पोलिसांकडून अटक – Bihar man in jail for refusing to return rupees 5 lakhs erroneously credited by bank claims gift from PM Modi :

वास्तविक, ही घटना आहे खगेरिया जिल्ह्यातील बख्तियारपूर गावाची. येथे रणजित दास नावाच्या व्यक्तीच्या खात्यात अचानक साडेपाच लाख रुपये आले. त्याने हे पैसे बँकेतून बाहेर काढले. जेव्हा बँकेला आपली चूक कळली, तेव्हा पैशांची परत मागणी करण्यात आली, परंतु त्याने नकार दिला. बँकेकडून वारंवार नोटीस देऊनही रणजितने पैसे परत केले नाहीत, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

रणजीत दास म्हणाला की, पीएम नरेंद्र मोदींनी त्याच्या खात्यात साडेपाच लाख रुपये पाठवले आहेत, त्यामुळे तो ते परत करणार नाहीत.रणजीतने नकार दिल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली. तो जवळच्या बख्तियारपूर गावाचा रहिवासी आहे. ग्रामीण बँकेने हा गुन्हा दाखल केल्याचे एसएचओ दीपक कुमार यांनी सांगितले. रणजीतला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपीच्या गावकऱ्यांनी सांगितले की, जेव्हा रणजीत दासच्या खात्यात पैसे आले, तेव्हा लोकांनी त्याला बँकेला याबाबत माहिती देण्यास सांगितले होते. पण त्याने ऐकले नाही आणि आता तुरुंगात जावे लागले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Bihar man in jail for refusing to return rupees 5 lakhs erroneously credited by bank claims gift from PM Modi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या