16 April 2025 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

Bikaji Foods IPO | बिकाजी फूड्स IPO गुंतवणुकीसाठी सज्ज, शेअरची किंमत आणि IPO चा पूर्ण तपशील वाचा

Bikaji Foods IPO

Bikaji Foods IPO | चमचमीत स्नॅक्स खाद्य पदार्थ आणि मिठाई बनवणारी कंपनी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने 881 कोटी रुपयांचा IPO आणण्याची योजना आखली आहे. बिकाजी फूड्स कंपनी आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर किंमत 285-300 रुपये जाहीर केली आहे. या कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, कंपनीचा IPO 3 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. आणि तो 7 नोव्हेंबर 2022 ला बंद करण्यात येईल. IPO मध्ये कंपनीचे प्रमोटर्स आणि विद्यमान शेअर धारक सुमारे 2.94 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी बाजारात जारी करतील. या IPO मध्ये कोणतेही नवीन शेअर्स विक्री केले जाणार नाहीत. IPO पूर्णपणे OFS म्हणजेच ऑफर फॉर सेलसाठी खुला केला जाईल. कंपनीला या IPO इश्यूमधून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. या IPO चा आकार 881.22 कोटी रुपयेचा असेल.

किमान गुंतवणूक आणि लॉट :
IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना किमान एक लॉटसाठी बोली लावावी लागेल, ज्यात किमान 50 इक्विटी शेअर्स वाटप केले जातील. बिकाजी कंपनी बिकानेरी भुजियाची सर्वात मोठी उत्पादक कंपनी असून, कंपनीची उत्पादन क्षमता 29,380 टन वार्षिक आहे. ही कंपनी पॅकबंद रसगुल्ला, सोन पापडी आणि गुलाब जामुनचे ही उत्पादन करते, आणि हे पदार्थ कंपनीचे सर्वात जास्त विक्री होणारे पदार्थ आहेत.

2010 मध्ये GI टॅग :
कंपनीने स्टॉक एक्सचेंज ला सादर केलेल्या पेपरनुसार, बिकानेरी भुजियाला 2010 मध्ये GI टॅग देण्यात आला होता, कारण हा बिकानेरचा लोकप्रिय कुटीर उद्योग आहे, जो तेथील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध करून देतो. नोंदणीकृत उत्पादकांशिवाय इतर कोणात्याही कंपनीला ‘बिकानेरी भुजिया’ हे नाव वापरून कोणतेही उत्पादन करण्याची परवानगी नाही. JM Financial, Axis Capital, IIFL Securities, Intensive Fiscal Services आणि Kotak Mahindra Capital Company यांना IPO इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Bikaji Foods IPO is ready to launch for investment check details with price band on 01 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bikaji Foods IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या