21 November 2024 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Bikaji Foods IPO | बिकाजी फुडस IPO सबस्क्रिप्शन पूर्ण, शेअरचा GMP जाणून घ्या, कमाईचा धमाका होणार

Bikaji Foods IPO

Bikaji Foods IPO | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीची इनिशियल पब्लिक ऑफर/IPO गुंतवणुकीसाठी खुली झाली आहे. IPO ओपन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर्स पूर्णपणे सबस्क्राइब झाले आहेत. शिवाय, सलग दोन दिवसांच्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क आठवड्याच्या वधारले. या घडामोडीचा परिणाम ग्रे मार्केटमध्येही दिसून आला होता. शेअर बाजार निरीक्षकांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे ​​शेअर्स 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बिकाजी फूड्स कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये प्रति इक्विटी शेअर 27 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

बिकाजी फूड्स IPO ची ग्रे मार्केटमधील कामगिरी :
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते बिकाजी फूड्स कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बिकाजी फूड्स कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये 27 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील दोन दिवसांत बिकाजी फूड्स कंपनीच्या IPO शेअर्सच्या GMP मध्ये वाढ होण्याचे दोन प्रमुख कारण म्हणजे शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सल पाहायला मिळाला, आणि सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी स्टॉक पूर्णपणे सबस्क्राइब झाला. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर शेअर बाजारात सतत वाढ होत राहिली तर ग्रे मार्केटमधील भावना अधिक तीव्र होतील, आणि शेअरची ग्रे मार्केटमधील किंमत आणखी वाढेल. बिकाजी फूड्स कंपनीचा आयपीओ जीएमपी सबस्क्रिप्शन सुरू होण्यापूर्वी 100 रुपये प्रीमियमवर होता.

GMP म्हणजे काय? :
स्टॉक मार्केट निरीक्षकांनी अंदाज व्यक्त केला आहे की, बिकाजी फूड्स कंपनीचा आयपीओ GMP 40 रुपये प्रिमियमवर ट्रेड करत आहे याचा अर्थ असा होतो की, ग्रे मार्केटचा अंदाज आहे की या आयपीओ मधील शेअर्सची किंमत 340 रुपयांच्या पातळीवर होईल, जी 300 रुपये या IPO किंमत बँडच्या तुलनेत 40 रुपये जास्त आहे. IPO किंमत बँडच्या तुलनेत ही किंमत 13 टक्के जास्त आहे. या कंपनीने IPO मध्ये प्रति इक्विटी शेअर 285 रुपये ते 300 रुपये हा प्राइस बँड जाहीर केला आहे.

बिकाजी फूड्स IPO च्या सदस्यत्वाची स्थिती :
हा IPO गुंतवणुकीसाठी खुला केल्याच्या दोन दिवसांनंतर बिकाजी फूड्स कंपनीच्या 881.22 कोटी रुपयांच्या सार्वजनिक इश्यूला 1.48 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. तर त्याचा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 2.33 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.

बिकाजी फूड्स IPO चे तपशील :
3 नोव्हेंबर 2022 रोजी हा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत या IPO मध्ये लोकांनी अर्ज दाखल केले. गुंतवणूकदारांसाठी IPO मध्ये अर्ज करण्याचा कालावधी काल संपला आहे. बिकाजी फूड्स IPO च्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार या IPO मध्ये शेअर्स वाटपाची तारीख 11 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. बिकाजी फूड्स IPO स्टॉक मार्केटमध्ये 16 नोव्हेंबर 2022 रोजी सूचीबद्ध केला जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Bikaji Foods IPO share price in gray Market reached on premium level on 08 November 2022.

हॅशटॅग्स

Bikaji Foods IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x