18 November 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

BOI Net Banking | 'या' सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! आता बँक FD वर अधिक व्याज मिळणार, व्याजदर तपासून घ्या

BOI Net Banking

BOI Net Banking | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने (BOI) मंगळवारी नवीन होलसेल डिपॉझिट स्कीम आणली. 175 दिवसांसाठी 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या ठेवींवर 7.50 टक्के व्याज दर आहे. बीओआय आतापर्यंत 174 दिवसांसाठी जमा केलेल्या रकमेवर 6 टक्के व्याज देत होती. हा नवा दर 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. BOI Internet Banking

बँकेने काय म्हटले
दोन कोटी रुपयांपासून ते 50 कोटीरुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर हा नवा व्याजदर लागू होणार आहे. विशेष मुदत ठेव ही केवळ रुपयातील ठेवींसाठी असते. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. हा नवा दर 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. दरम्यान, खासगी क्षेत्रातील डीसीबी बँकेने ‘हॅप्पी सेव्हिंग्ज अकाउंट’ची घोषणा केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी – Senior Citizen Saving Scheme
दोन कोटीरुपयांपेक्षा कमी रकमेच्या किरकोळ मुदत ठेवींसाठी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेवर अतिरिक्त 0.50 टक्के व्याज मिळणार आहे. यासाठी कमीत कमी कालावधी 6 महिने किंवा त्याहून अधिक, जास्तीत जास्त 3 वर्षे आहे. याच कालावधीत 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना याच किरकोळ मुदत ठेवीवर 0.65 टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ठेवींच्या व्याजदरात 50 बेसिस पॉईंट्सपर्यंत (बीपीएस) वाढ केली आहे, जी 27 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहे. ही 50 बीपीएस ची वाढ 7 ते 45 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींसाठी आहे.

नुकतीच बँक ऑफ बडोदाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. बँक ऑफ बडोदाने 16 वर्षे ते 25 वर्षे वयोगटातील ग्राहकांसाठी शून्य शिल्लक बचत खाते ‘बॉब बीआरओ बचत खाते’ सुरू केले आहे. या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. तरुण ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी बँक ऑफ बडोदाचे हे मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. या बचत खात्यात खाते उघडणाऱ्या ग्राहकांनाही बरीच सुविधा मिळणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : BOI Net Banking New FD Interest Rates 03 January 2024.

हॅशटॅग्स

#BOI Net Banking(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x