25 April 2025 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या
x

Bombay Burmah Share Price | अल्पावधीत मोठा परतावा देणारा शेअर! एका दिवसात 20 टक्के परतावा, शेअरची पुढची टार्गेट प्राईस

Bombay Burmah Share Price

Bombay Burmah Share Price | बॉम्बे बर्मा कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अपर सर्किटमध्ये 1420.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बॉम्बे बर्मा या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9911.10 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरने शुक्रवारी एका दिवसात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 20 टक्के वाढवले आहे. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी बॉम्बे बर्मा स्टॉक 20.00 टक्के वाढीसह 1,419.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

तांत्रिक चार्टचे निरीक्षण केल्यास आपल्या समजेल की, बॉम्बे बुमराह ट्रेडिंग कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. पुढील काळात या कंपनीचे शेअर 1300 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. प्रभुदास लिलाधर फर्मच्या मते, या कंपनीच्या शेअर्समध्ये 1160 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे.

पुढील काळात हा स्टॉक 1300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या कंपनीचा स्टॉक चार्ट पॅटर्न तेजीचे संकेत देत आहे. तेजीचा ट्रेंड असाच सुरू राहिला तर या कंपनीचे शेअर्स 1560 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. काही तज्ज्ञांच्या मते, हा स्टॉक असाच तेजीत वाढत राहिला तर अल्पावधीत शेअर 1780 रुपये ते 1800 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

मागील 3 महिन्यांत बॉम्बे बर्मा कंपनीच्या शेअरची किंमत 28 टक्के मजबूत झाली आहे. 2023 या वर्षात बॉम्बे बर्मा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात बॉम्बे बर्मा स्टॉक 58 टक्के मजबूत झाला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 53 टक्के वाढली आहे. तर मागील 5 दिवसात या कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bombay Burmah Share Price NSE 21 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bombay Burmah Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony