29 September 2024 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan EMI | गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी अलर्ट, अन्यथा 50 लाखांच्या कर्जावर अधिकचे 25 लाख रुपये भरावे लागतील, ही चूक टाळा Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, पुन्हा कमाई होणार, 1 वर्षात दिला 1719% परतावा - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ब्रेकआउट देणार, स्टॉक रेटिंग 'अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Axis Mutual Fund | बँक FD नव्हे, या म्युच्युअल फंड योजना वर्षाला 30 ते 40 टक्के परतावा देतील, पैशाने पैसा वाढवा - Marathi News NMDC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, शॉर्ट टर्ममध्ये होईल 25 टक्के कमाई - Marathi News BHEL Share Price | BHEL आणि टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - Marathi News Multibagger Mutual Fund | शेअर्स नको, या फंडाच्या योजना 4 ते 5 पटीने पैसा वाढवतील, यादी सेव्ह करून ठेवा - Marathi News
x

Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, पुन्हा कमाई होणार, 1 वर्षात दिला 1719% परतावा - Marathi News

Highlights:

  • Bondada Share PriceNSE: BONDADA – बोंदांडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी अंश
  • नवीन ऑर्डरचे मूल्य 575 कोटी रुपये
  • मागील 1 वर्षात दिला 1719% परतावा
Bondada Share Price

Bondada Share Price | बोंदांडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 627 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये (NSE: BONDADA) वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना 468 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. नुकताच KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने 130 MWp/100MWac सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी साहित्याचा पुरवठा आणि सोलर आणि इन्स्टॉलेशन करण्याचे काम बोंदांडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला दिले आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 468 कोटी रुपये असून ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांना 12 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. (बोंदांडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी अंश)

शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी बोंदांडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.63 टक्के वाढीसह 607.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. यापूर्वी बोंदांडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला लुमिना क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, प्युअरलाइट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि व्हीव्हीकेआर फोटोव्होएटिक्स एनर्जी लिमिटेड यांसारख्या कंपन्यांनी देखील विविध कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत.

नवीन ऑर्डरचे मूल्य 575 कोटी रुपये
या कॉन्ट्रॅक्टमध्ये मुख्यतः ग्रिड जोडलेल्या सौर ऊर्जा संयंत्रांचे डिझाइन, सर्वेक्षण, पुरवठा, स्थापना, चाचणी यांसारख्या कामाचा समावेश आहे. तसेच या कंपनीला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री कुसुम सौर प्रकल्प आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत अनेक कामे मिळाली आहेत. या संपूर्ण ऑर्डरचे मूल्य 575 कोटी रुपये आहे.

मागील 1 वर्षात दिला 1719% परतावा
मागील 6 महिन्यांत बोंदांडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1719 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 753 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 32 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bondada Share Price 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Bondada Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x