
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचा IPO मागील वर्षी ऑगस्टमध्ये 75 रुपये किमतीवर लाँच झाला होता. या कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किमतीच्या तुलनेत 1350 टक्के वाढले आहेत. ( बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनी अंश )
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1108 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 142.50 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 75 रुपयेवरून वाढून 1100 रुपयेच्या पार गेली आहे. आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग स्टॉक 4.83 टक्के वाढीसह 1,155 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचा आयपीओ 18 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या शेअर्सची प्राईस बँड 75 रुपये निश्चित केली होती. 30 ऑगस्ट 2023 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 95 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 142.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स 149.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 10 एप्रिल 2024 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1103 रुपये किमतीवर पोहोचले होते. IPO इश्यू किमतीच्या तुलनेत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1370 टक्क्यांनी वाढली आहे.
बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 1600 शेअर्स ठेवले होते. एक लॉटची किंमत 1.20 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. ज्या लोकांनी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या IPO मध्ये 1.20 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 17.64 लाख रुपये झाले आहे. या कंपनीचा IPO एकूण 112.28 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 100.05 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























