27 January 2025 10:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Bonus Share News | फायदाच फायदा! फ्री बोनस शेअर्ससहित स्टॉक स्प्लिटचा लाभ घ्या, पैशाने पैसा वाढवा

Bonus Share News

Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासह कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे. आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी मारुती इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 3.27 टक्के वाढीसह 222.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश )

मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 तुकड्यात विभाजित करणार आहे. त्यानंतर या शेअरची दर्शनी किंमत 2 रुपये किमतीवर येईल. यासह ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे.

मारुती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अद्याप बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. ही कंपनी प्रथमच बोनस शेअर्स वाटप करणार आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 215.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत मारुती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 38 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 254.70 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 100.05 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 269.25 कोटी रुपये आहे. प्रवर्तकांनी मारुती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे एकूण 52.31 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 47.68 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News Maruti Infra Share Price BSE Live 24 June 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x