17 November 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Bonus Share News | मिळतील फ्री शेअर! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी शेअरने 705% परतावा दिला

Bonus Share News

Bonus Share News | अल्फालॉजिक टेकसिस या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. अल्फालॉजिक टेकसिस कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 14:48 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकदारांना प्रत्येक 48 शेअर्सवर 14 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. ( अल्फालॉजिक टेकसिस या कंपनी अंश )

या कंपनीने शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 13 जुलै हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी अल्फालॉजिक टेकसिस स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 301 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. अल्फालॉजिक टेकसिस ही कंपनी आपल्या शेअरधारकांना चौथ्यांदा बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ऑगस्ट 2021 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 27:10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच या कंपनीने प्रत्येक 10 शेअर्सवर 27 बोनस शेअर्स मोफत दिले होते. सप्टेंबर 2022 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीने गुंतवणुकदारांना 1:3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते.

मागील एका वर्षात अल्फालॉजिक टेकसिस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 705 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 35.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 4 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 286.70 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 6 महिन्यात अल्फालॉजिक टेकसिस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 71.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 400.55 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 32.55 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on Alphalogic Share Price NSE Live 05 July 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x