27 January 2025 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Bonus Share News | सुवर्ण संधी सोडू नका, फ्री बोनस शेअर्स मिळवा, शॉर्ट टर्म मध्ये मोठा फायदा होईल

Bonus Share News

Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ( ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनी अंश )

या कंपनीने शुक्रवार दिनांक 14 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 27 जून 2024 रोजी हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.60 टक्के वाढीसह 2,702.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणुकदारांना 27 जूनपर्यंत मोफत बोनस शेअर्स जारी केले जातील. बोनस शेअर्सची घोषणा केल्यावर ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. एप्रिल 2023 मध्ये ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 300 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 2700 रुपये किमतीवर पोहचला आहे. या बँकिंग, पेमेंट आणि वित्त क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कंपनीचे कार्यालय मुंबईमध्ये आहे.

मार्च 2023 मध्ये ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 33 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर जून 2023 मध्ये हे प्रमाण 31.19 टक्क्यांवर आले होते. सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीच्या प्रवर्तकांचा वाटा 30.8 टक्क्यांवर घसरला होता. डिसेंबर 2023 मध्ये हे प्रमाण 30.18 टक्केवर आले होते.

मार्च 2024 मध्ये ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 29.91 टक्के भाग भांडवल होते. मार्च 2023 मध्ये कंपनीच्या तारण ठेवलेल्या शेअर्सचा वाटा 26.19 टक्के होता. जो मार्च 2024 मध्ये 21.13 टक्क्यांवर आला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on Aurionpro Share Price NSE Live 17 June 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x