27 January 2025 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार! संधी सोडू नका, रेकॉर्ड तारीख पूर्वी फायदा घ्या

Bonus Share News

Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीबाबत थोडक्यात माहिती देणार आहोत. ( क्लारा इंडस्ट्रीज कंपनी अंश )

या कंपनीचे नाव आहे, क्लारा इंडस्ट्रीज. ही स्मॉलकॅप कंपनी मुख्यतः पॅकेजिंग क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी क्लारा इंडस्ट्रीज स्टॉक 2.36 टक्के घसरणीसह 230 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

क्लारा इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर वाटप करण्याचे प्रमाण आणि रेकॉर्ड तारीख निश्चित केले आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्के वाढीसह व्यवहार करत होते. या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणूकदारांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 8 जुलै हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.

रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या शेअरधारकांची नावे कंपनीच्या रजिस्टरमध्ये असतील त्यांनाच कंपनी बोनस शेअरचा लाभ देईल. जून 2024 या महिन्यात क्लारा इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या शेअरधारकांना लाभांश देखील वाटप केला होता. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के नफा कमवून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्के वाढली आहे. क्लारा इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 264 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 141.55 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on Clara Industries Share Price 21 June 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x