26 April 2025 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | आयआरबी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, 46 रुपयांच्या शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC HUDCO Share Price | सरकारी कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, पुढे मिळेल मोठा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO AWL Share Price | अदानी वील्मर शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: AWL HAL Share Price | मंदीत संधी, हा डिफेन्स कंपनीचा शेअर खरेदी करा, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: HAL BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल
x

Bonus Share News | संधी सोडू नका! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, पैशाने पैसे वाढवा

Bonus Share News

Bonus Share News | ओबेरॉय ग्रुपचा भाग असलेल्या ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीने शुक्रवार दिनांक 14 जून रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ( ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनी अंश )

ज्या शेअरधारकांकडे रेकॉर्ड तारखेपूर्वी ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स स्टॉक 6.53 टक्के वाढीसह 901 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला माहिती दिली की, कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या एका शेअरवर एक बोनस शेअर्स मोफत देणार आहे. कंपनीने गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी 29 जुलै 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. यापूर्वी ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीने मार्च तिमाही निकालांसह आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 6 रुपये लाभांश वाटप केला होता.

आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीने 1.08 रुपये किमतीवर राइट इश्यू जाहिर केला होता. यात कंपनीने प्रत्येक 9 शेअर्सवर 5 शेअर्स जारी केले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी हा स्टॉक 849 रुपये किमतीवर ओपन झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 925 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 413 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on EIH Share Price NSE Live 15 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bonus Share News(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या