24 January 2025 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC Nippon India Growth Fund | पगारदारांनो, श्रीमंत करतेय या फंडाची योजना, 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4 कोटी रुपये परतावा मिळेल Salary Account | बँकेत चक्कर न मारता सॅलरी अकाउंट बनेल पेन्शन अकाउंट, मिळतील अनेक फायदे, नोट करून ठेवा NTPC Share Price | एनटीपीसी शेअरवर ब्रोकरेज बुलिश, 36 टक्के तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत मोठे संकेत, ब्रोकरेज फर्मने दिला महत्वाचा सल्ला - NSE: TATATECH EPFO Pension Money | आता सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना महिना 7,500 रुपये पेन्शन मिळणार, मोठ्या फायद्याची अपडेट आली Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन
x

Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी 1 शेअर वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: REDTAPE

Bonus Share News

Bonus Share News | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी रेडटेप लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. रेडटेप लिमिटेड कंपनी शेअर्स तेजीत येण्याचे कारण म्हणजे कंपनीने केलेली बोनस शेअर्सची घोषणा. रेडटेप कंपनीने गुंतवणूकदारांना एका शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने रेकॉर्ड तारीख सुद्धा जाहीर केली आहे.

बोनस शेअर्स रेकॉर्ड तारीख

23 जानेवारी रोजी रेडटेप लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना म्हटले आहे की, ‘पात्र गुंतवणूकदारांना 2 रुपयांच्या फेस वॅल्यूच्या प्रत्येक 1 शेअरमागे 3 नवीन बोनस शेअर्स दिले जातील. त्यासाठी रेडटेप लिमिटेड कंपनीने मंगळवार ४ फेब्रुवारी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात ४ फेब्रुवारीपर्यंत रेडटेप कंपनीचा १ शेअर असेल त्यांच्या डिमॅट खात्यात 3 नवीन फ्री शेअर्स जमा केली जातील.

रेडटेप शेअर्सची कामगिरी

11 ऑगस्ट 2023 रोजी रेडटेप लिमिटेड कंपनी शेअर 493.85 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या रेडटेप लिमिटेड कंपनी शेअर 755.20 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची गुरुवारची बंद किंमत 740.60 रुपये होती. शुक्रवारी दिवसभरात रेडटेप लिमिटेड कंपनी शेअर 740.15 रुपये ते 758.40 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. लॉन्ग टर्ममध्ये रेडटेप लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 52.68% परतावा दिला आहे.

शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी रेडटेप लिमिटेड कंपनी शेअर 1.97 टक्क्यांनी वाढून 755.20 रुपयांवर पोहोचला होता. रेडटेप लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप सध्या 10,462 कोटी रुपये आहे. रेडटेप लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 980 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 536.10 रुपये होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bonus Share News on Redtape Share Price Friday 24 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Bonus Share News(47)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x