27 January 2025 10:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर, 1 महिन्यात दिला 36% परतावा

Bonus Share News

Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सकुमा एक्सपोर्ट्स ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. 19 जून रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 36.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,136.60 कोटी रुपये आहे. ( सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी अंश )

सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 38.42 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.15 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी सकुमा एक्सपोर्ट्स स्टॉक 0.36 टक्के वाढीसह 36.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीने 1 जुलै 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्या आपले राखीव भांडवल वाढवण्यासाठी, आणि त्यांची प्रति शेअर कमाई आणि पेड-अप भांडवल वाढवण्यासाठी, गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करत असतात.

सध्या सकुमा एक्सपोर्ट्स ही कंपनी यूकेमध्ये इथेनॉल प्लांट उभारण्याची तयारी करत आहे. सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीला युकेस्थित प्लांटमधुन 1.75 टक्के प्रॉफिट मार्जिनसह दरमहा 400 ते 500 कोटी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. सकुमा एक्सपोर्ट्स ही कंपनी युरोपमधील इथेनॉलच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी व्यवसाय विस्तार करत आहे. सकुमा एक्सपोर्ट्स ही कंपनी जगभरातील 70 पेक्षा जास्त देशांमध्ये विस्तीर्ण ग्राहकांच्या संख्येसह साखर निर्यात व्यवसाय करणारी एक प्रमुख कंपनी आहे.

मागील एका महिन्यात सकुमा एक्स्पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देणार आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 125 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात सकुमा एक्सपोर्ट्स स्टॉक 93 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 152 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 350 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on Sakuma Exports Share Price 20 June 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x