20 April 2025 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा! फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभाने अल्पावधीत मालामाल होणार का?

Bonus Shares

Bonus Shares | सनशाइन कॅपिटल कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. सनशाइन कॅपिटल कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 12 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत.

सनशाइन कॅपिटल कंपनीच्या संचालक मंडळाने विविध कॉर्पोरेट संस्थांकडून कर्जाद्वारे 500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यास सहमती दर्शवली आहे. मागील 3 वर्षात सनशाइन कॅपिटल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2,239.70 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सनशाइन कॅपिटल कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 142.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सनशाइन कॅपिटलकंपनीच्या संचालक मंडळाने बैठकीत आपले शेअर्स स्प्लिट करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर केला आहे. सनशाइन कॅपिटल कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 10 तुकड्यात विभाजित करणार आहे. त्यांनतर शेअरची दर्शनी किंमत 1 रुपये होईल. मात्र कंपनीने अद्याप स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाहीये. सनशाइन कॅपिटल कंपनीने भांडवल उभारणी आणि स्टॉक स्प्लिट सोबतच, राइट इश्यू मागे घेण्यास सहमती दर्शवली आहे.

सनशाइन कॅपिटल कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवर 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले 7 बोनस शेअर वाटप करणार आहे. मात्र अद्याप कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाहीये. बोनस आणि स्टॉक स्प्लिटच्या अंमलबजावणीनंतर सनशाइन कॅपिटल कंपनीचे 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअरचे 80 शेअर्स होतील.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.73 टक्के वाढीसह 139.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 वर्षांत सनशाइन कॅपिटल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2,239.70 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 22.82 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात सनशाइन कॅपिटल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 29.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 207.80 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares of Sunshine Capital 15 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या