28 December 2024 6:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC
x

Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 406% परतावा देणाऱ्या युग डेकोर शेअर्सवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड तारीख पूर्वी फायदा घ्या

Bonus Shares

Bonus Shares | युग डेकोर या रसायन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच युग डेकोर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 15:100 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Yug Decor Share Price

या बोनस शेअर्स वाटपाची पात्रता निश्चित कडण्यासाठी कंपनीने 5 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी युग डेकोर स्टॉक 89.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअरची कामगिरी
युग डेकोर कंपनीच्या शेअरने मागील 2 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 380 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे. युग डेकोर कंपनीचे शेअर्स 119.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 23 टक्के खाली ट्रेड करत आहेत.

मागील 3 महिन्यांत युग डेकोर कंपनीच्या शेअरने आपला गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 406 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत युग डेकोर स्टॉकची किंमत 386 टक्के मजबूत झाली आहे.

कंपनीचा व्यवसाय
युग डेकोर ही कंपनी मुख्यतः कॉन्टॅक्ट अॅडेसिव्ह, पीव्हीए ग्लू, वुड ग्लू आणि शू ग्लू यांसारख्या सर्व अॅडसेव्ह्जचे उत्पादन करण्याचे काम करते. युग डेकोर ही कंपनी भारत आणि आशिया खंडातील काही देशात, तसेच युरोप आणि आफ्रिकेसह जगभरात आपले उत्पादन निर्यात करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा ग्राहक वर्ग बांगलादेश, दुबई, सौदी अरेबिया, इथिओपिया, इराक, मोझांबिक, नेपाळ, श्रीलंका, टांझानिया आणि येमेन या देशात पसरला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares of Yug decor Share price 29 September 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x