5 November 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

Bonus Shares | तुम्हाला फुकट शेअर्स मिळतील! संधी सोडू नका, रेकॉर्ड तारीखपर्यंत घ्या एंट्री, मजबूत फायदा होईल

Bonus Shares

Bonus Shares | ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. मागील सहा महिन्यात ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीच्या शेअरने चांगली कामगिरी केली. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स 6.11 टक्के वाढीसह 341.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. Allcargo Logistics Share Price

ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीने सेबीला कळवले होते की, कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे. ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 3 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच ही कंपनी गुंतवणूकदारांना एका शेअरवर 3 बोनस शेअर्स वाटप करणार आहे.

नुकताच ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीने आपल्या ऑलकार्गो ग्रुपमध्ये पुनर्रचना करण्याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत, ऑलकार्गो कंपनी आपला आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी व्यवसाय ऑलकार्गो ईसीयू कंपनी या नावाने विलग करणार आहे. यासाठी ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीच्या गुंतवणूकदारांना एका शेअरच्या बदल्यात त्याला Allcargo ECU कंपनीचा एक शेअर दिला जाईल.

या व्यवसायाच्या विलगीकरणानंतर, ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनी एक्सप्रेस आणि कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक व्यवसाय ताब्यात घेईल आणि ऑलकार्गो गती कंपनी ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीमध्ये विलीन केली जाईल. या बदल्यात ऑलकार्गो गती कंपनीच्या गुंतवणुकदारांना प्रत्येक 10 शेअरवर डिमर्जर झालेल्या ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीचे 63 शेअर्स दिले जातील.

मागील एका महिन्यात ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 21 टक्के वाढली आहे. YTD आधारे ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15.95 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Allcargo Logistics Share Price 01 January 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x