11 January 2025 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

Bonus Shares | फुकट शेअर्स हवे आहेत का? मग या कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारीख पूर्वी खरेदी करा, फायदा घ्या

Bonus Shares

Bonus Shares | अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. बोनस शेअर्सची बातमी येताच अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. | Alphalogic Industries Share Price

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या हा शेअर 3.06% वाढीसह 349.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.

अल्फालॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची स्थापना 2014 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः स्टोरेज सिस्टम उद्योगाना सेवा प्रदान करते. अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनी ऑफिस आणि घरांच्या स्टोरेज समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते. या कंपनीचे शेअर्स जून 2023 मधे शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 1 डिसेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.

श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स या वाहतूक व्यवसायात गुंतलेल्या कंपनीने देखील आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 21 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक गुंतवणुकदारांना बोनस शेअर्सबाबत निर्णय घेऊ शकतात.

SBC Exports Ltd या कंपनीची स्थापना 1991 साली गणेश प्रसाद गुप्ता यांनी केली होती. ही कंपनी मुख्यतः कापड क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी टी-शर्ट आणि डेनिम स्वेट शर्ट बनवण्याचा व्यवसाय करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार संचालक मंडळाची बैठक 5 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

जेव्हा एखादी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना किंमत शेअर धारकांना मोफत शेअर्स वाटप करते, त्याला बोनस शेअर्स म्हणतात. कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना विशिष्ट प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करत असतात. जर एखाद्या कंपनीने 1:1 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली तर, कंपनी गुंतवणूकदारांना त्यांनी धारण केलेल्या एका शेअरवर 1 बोनस शेअर वाटप करतात.

बोनस इश्यूनंतर कंपनीचे इक्विटी भांडवल वाढते मात्र कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य तसेच राहते. शेअरच्या दर्शनी मूल्यात कोणताही बदल न झाल्याने, गुंतवणूकदाराला भविष्यात जास्त लाभांश मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Alphalogic Industries Share Price BSE 24 November 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x