18 November 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Bonus Shares | फुकट शेअर्स मिळविण्याची संधी! अल्पावधीत गुंतवणुकीचा पैसा वाढेल, वेळीच फायदा घ्या

Bonus Shares

Bonus Shares| FIEM इंडस्ट्रीज या ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. FIEM इंडस्ट्रीज कंपनीचे (Fiem Industries Share Price) शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2,493 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली झाली आहे. नुकताच FIEM इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. Fiem Share Price

FIEM इंडस्ट्रीज ही कंपनी आपल्या शेअरधारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी FIEM इंडस्ट्रीज स्टॉक 2.94 टक्के घसरणीसह 2,428.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

FIEM इंडस्ट्रीज कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यापूर्वी शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. FIEM इंडस्ट्रीज ही कंपनी S&P BSE SmallCap निर्देशांकाचा भाग आहे.

ही कंपनी मुख्यतः ऑटो पार्टस आणि उपकरणे बनवण्याचे काम करते. FIEM इंडस्ट्रीज कंपनी ऑटोमोटिव्ह लाइटिंग, सिग्नलिंग उपकरणे, रिअर व्ह्यू मिरर, शीट मेटल आणि प्लॅस्टिक पार्ट्स बनवणारी अग्रणी कंपनी आहे. नुकताच FIEM इंडस्ट्रीज कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त देखील झाली आहे. या कंपनीची स्थापना 1989 साली झाली होती.

मागील एका आठवड्यात FIEM इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा दिला आहे. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात FIEM इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात FIEM इंडस्ट्रीज कंपनीच्या गुंतवणुकदारांनी या स्टॉकमधून 90 टक्के परतावा कमावला आहे.

मागील तीन वर्षांत FIEM इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने लोकांना 311 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. तर 10 वर्षांत FIEM इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तब्बल 663 टक्के मजबूत झाले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2,587.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1,420.80 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,309.70 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Fiem Share Price 16 January 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x