18 November 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Bonus Shares | कुबेर पावला! शेअरने मागील 3 महिन्यांत दिला 458 टक्के परतावा, आता फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?

Bonus Shares

Bonus Shares | गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुश खबर आहे. दिवाळीपूर्वीच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप केले आहेत. गिरीराज सिव्हिल कंपनीने नुकताच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच कंपनीने आपल्या शेअरधारकांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स दिले आहेत. Giriraj Civil Developers Share Price

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.03 टक्के वाढीसह 2047 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर आज दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी बोनस शेअर्स वाटप केल्यावर गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 409.25 रुपयेवर आली आहे.

गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गिरीराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 4: 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनीने सेबीला कळवले होते की, लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन, 2015 च्या रेग्युलेशन 42 नुसार, कंपनीने आपल्या शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या एका शेअरवर 4 बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 हा दिवस निश्चित केला होता. गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उचांक किंमत पातळी 2050.00 रुपये होती  आणि नीचांक किंमत पातळी 119.05 रुपये होती.

गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स कंपनीच्या शेअरने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 458 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1537 टक्के परतावा कमावून दिला आहे. गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 932.90 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Giriraj Civil Developers Share Price NSE 03 November 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x