18 November 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

Bonus Shares | या शेअरमध्ये अमिताभ बच्चन यांची गुंतवणूक, डीपी वायर्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, खरेदी करणार?

Bonus Shares

Bonus Shares | डीपी वायर्स ही लोह आणि धातू उद्योग क्षेत्रात व्यवसाय करणारी स्मॉल-कॅप कंपनी विशेष LRPC स्ट्रँड्स, स्टील वायर्स आणि जिओमेम्ब्रेन शीट्सची आघाडीची उत्पादक म्हणून ओळखली जाते. डीपी वायर्स ही कंपनी मध्य प्रदेश राज्यातील रतलाम याठिकाणी कार्यरत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार डीपी वायर्स ही कंपनीने आता वार्षिक 50 हजार मेट्रिक टन स्टील वायर तयार करण्याची क्षमता साध्य केली आहे. पुढील काळात ही कंपनी 70 हजार मेट्रिक टन वायर निर्मिती क्षमता साध्य करू शकते. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी डीपी वायर्स स्टॉक 1.02 टक्के वाढीसह 666.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डीपी वायर्स कंपनीच्या प्रीमियम उत्पादनांमध्ये लो रिलॅक्सेशन प्री-स्ट्रेस्ड कॉंक्रीट स्ट्रँड्स, स्टील वायर, नॉर्मल रिलॅक्सेशन प्री-स्ट्रेस्ड कॉंक्रीट वायर आणि स्ट्रँड्स यासारखे उत्पादने सामील आहेत. DP वायर्स लिमिटेड ही कंपनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार वायर उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीने स्टॉक फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 7 शेअर्सवर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.

मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्सचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या बोनस शेअर्स वाटपानंतर कंपनीच्या अधिकृत भांडवलात 18 कोटी रुपये वाढ होणार आहे.

डीपी वायर्स कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना रेकॉर्ड तारखेला 7 इक्विटी शेअर्सवर 1 नवीन इक्विटी बोनस वाटप करणार आहे. डी.पी. वायर्स कंपनीच्या शेअर होल्डर लिस्टमध्ये बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे नाव देखील सामील आहे. अमिताभ बच्चन यांनी डीपी वायर्स कंपनीचे 2 लाख 81 हजार 112 इक्विटी शेअर्स होल्ड केले आहेत. अमिताभ बच्चन यांनी डी.पी. वायर्स कंपनीचे 2.07 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी डी.पी. वायर कंपनीचे शेअर्स 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 658.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 724.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 330.30 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares today on 09 October 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x