6 November 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Brightcom Group Share Price | करोडपती करणारा शेअर 74% स्वस्त झाल्यानंतर स्टॉक खरेदी पुन्हा वाढली, नेमकं कारण काय?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळापासून घसरण पहायला मिळत होती. मात्र कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकने 11 टक्के पेक्षा जास्त उसळी घेतली. आज गुरूवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 26.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एक वर्षापासून या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना वैताग दिला होता. या दरम्यान शेअरची किंमत जवळपास 74 टक्के खाली आली. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने 30 टक्क्यांची पडझड नोंदवली आहे. मात्र मागील काही दिवसापासून स्टॉकमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांत ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 4.68 टक्के वाढली आहे. 2021 मध्ये या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 2,500 टक्के परतावा कमावून दिला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)

शेअरमध्ये जबरदस्त पडझड :
‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 102.75 रुपयांवरून घसरून 26 रुपयांवर आले आहेत. या दरम्यान स्टॉकची किंमत 74 टक्के खाली आली आहे. कंपनीचे काही प्रकटीकरण आणि आर्थिक व्यवहार गुंतवणूकदारांचे ” नुकसान करणारे ” असल्याची चिंता सेबीने व्यक्त केल्यानंतर ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकमध्ये उतरती कळा लागली. या कंपनीच्या शेअर्समधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना जबर तोटा सहन करावा लागला आहे. सेबीने मागील वर्षी ब्राइटकॉम कंपनीच्या आर्थिक बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी ‘Deloitte Touche Tohmatsu India LLP’ या फर्मची नियुक्ती केली होती. “सेबीने अशा प्रकरणाबाबत वेगाने हालचाल करणे आणि त्यांची तपास यंत्रणा मजबूत करणे खूप गरजेचे आहे असे मत, ‘लुथरा आणि लुथरा लॉ ऑफिस’ इंडियाच्या हरीश कुमार यांनी व्यक्त केले आहे.

ब्राइटकॉम ग्रुप शेअरहोल्डिंग :
‘ब्राइटकॉम ग्रुप’ च्या डिसेंबर 2022 मधील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, दिग्गज गुंतवणूकदार विजय कुमार कंचर्ला यांनी ब्राइटकॉम ग्रुपचे 4.36 कोटी शेअर्स धारण केले आहेत, जे कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या 2.16 टक्के आहे. एम गांगी रेड्डी यांच्याकडे कंपनीचे 3.22 कोटी शेअर्स आहे. शेअर धारकांच्या यादीतून दिग्गज शेअर बाजार व्यापारी ‘शंकर शर्मा’ यांचे नाव गायब झाले आहे. म्हणजेच त्यांनी आपले शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले आहेत. शंकर शर्मा यांच्याकडे सप्टेंबर 2022 तिमाहीपर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त शेअर होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price 532368 BCG stock market live on 16 February 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x