22 November 2024 12:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Brightcom Group Share Price | गुंतवणुकदारांना करोडपती बनवणारा शेअर, कंपनी चौकशीच्या फेऱ्यात, शेअरचे पुढे काय होणार?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीने डिजिटल जाहिरात क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या विरोधात अँक्शन घेतली आहे. सेबीने कंपनीची आर्थिक चौकशी करता, सेबीला कंपनीच्या व्यापारी बँक खात्यांमध्ये 1280 कोटी रुपयांचा घोटाळा आढळून आला आहे. सेबीने कंपनीच्या बँक खात्यांची चौकशी केली आणि घोळ पकडल्यानंतर सेबीने कंपनीवर कारवाई केली आहे. सेबीचे बोर्ड सदस्य अश्विनी भाटिया यांनी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीला शेअर होल्डिंगची पूर्ण माहिती देण्याचे आणि पुढील 7 दिवसांत काम करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आधी कंपनीच्या बोनस शेअर्समध्ये ही असाच घोटाळा आढळून आला होता. गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 15.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Brightcom Group Limited)

कंपनीविरुद्ध कडक ऍक्शन :
सेबीने ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीविरुद्ध जारी केलेल्या ऑर्डरची एक लांबलचक लिस्ट जाहीर केली आहे. सेबीने चौकशी असता त्यांना समजले की, कंपनीने बँक खात्यांमध्ये खर्च कमी आणि नफा जास्त दाखवला आहे. याशिवाय मागील 34 पैकी 31 तिमाहीच्या आर्थिक निकालात कंपनीने चुकीचे शेअर होल्डिंग तपशील जाहीर केले होते. याशिवाय कंपनीने 1280 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे निरीक्षण सेबीने नोंदवले आहे. SEBI ने कंपनीच्या 2014-15 ते 2019-20 या काळातील बँक खात्यांची तपासणी केली असता असे आढळून आले आहे की, ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे निकाल चुकीचे आहेत. ही सर्व अनियमितता लक्षात घेऊन सेबीने कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशानंतर 165 दिवस कालावधी घेऊन कंपनीने आपल्या आर्थिक कामाचा खुलासा केला आहे. सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ब्राइटकॉम ग्रुपला पुढील 21 दिवसांत आरोपांवर उत्तर द्यावे लागणार आहे.

कंपनीच्या लेखापरीक्षकांवर प्रश्न उपस्थित :
सेबीने आपल्या आदेशात ब्राइटकॉम समूहाच्या लेखापरीक्षकांवर ही संशय व्यक्त केला आहे. सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, कंपनीमध्ये एवढ्या अनियमितता असून सुद्धा लेखापरीक्षकांनी त्यांच्या निरीक्षणात आणि टिप्पण्यांमध्ये कोणतीही माहिती दिली नाही. कोणतीही कंपनी लेखापरीक्षकांना किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना 1 लाख रुपये पेक्षा जास्त किमतीचे शेअर्स देऊ शकत नाही, असा नियम असूनही आहे, ऑडिटरच्या कुटुंबातील सदस्यांकडे कंपनीचे 3.5 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रवर्तकांनीचा वेगळाच गोंधळ :
‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे शेअर्स अत्यंत कमी किमतीत खरेदी केले आणि जेव्हा किंमत वाढली तेव्हा त्यांनी शेअर एकसाथ नफ्यात विकून टाकले. प्रवर्तकांनी चुकीच्या पद्धतीने शेअरची खरेदी-विक्री करून नफा कमावल्याचे सेबीने अहवालात म्हंटले आहे.

सेबीने लादलेले निर्बंध :
सेबीने ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या अध्यक्ष, CFO, प्रवर्तक गटातील आणखी 2 लोकांच्या शेअर्स विकण्यावर बंदी घातली आहे. सेबीने वरील चार जणांचे शेअर्स फ्रीज आहेत. कंपनीला 2014-15 ते 2021-22 पर्यंत केलेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती द्यावी लागणार आहे. आणि शेअरहोल्डिंगची सविस्तर माहिती सात दिवसांत सादर करावी लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price on 15 April 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x