21 November 2024 8:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Brightcom Group Share Price | 85% घसरून स्वस्त झालेला मल्टिबॅगर ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, 5 दिवसात 20% परतावा

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर मध्ये मागील एका वर्षात 83.64 टक्के घसरण झाली आहे. तर YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 60 टक्क्यांहून अधिक कमजोर झाले आहेत. मागील पाच दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 36 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 68 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 74.85 रुपये होती, तर नीचांक पातळी किंमत 9.35 रुपये होती. शुक्रवार दिनांक 5 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 4.65 टक्के वाढीसह 11.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जानेवारी ते मार्च 2023 हा तिमाहीमधील लेटेस्ट शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीमध्ये दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी 2.50 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत. त्यांच्या शेअरचे एकूण प्रमाण कंपनीच्या भाग भांडवलाच्या 1.24 टक्के आहे. NSE वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार, ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. 28 एप्रिल 2023 पासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स दररोज 5 टक्के अप्पर सर्किट तोडत आहेत.

‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ या डिजिटल मार्केटिंग स्मॉल कॅप कंपनीने डॉ सुरभी सिन्हा यांना नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डायरेक्टर पदी पुनर्नियुक्त केले आहेत. त्यामुळे शंकर शर्मा यांच्या पोर्टफोलिओमधील हा स्टॉक दररोज अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. डॉ सुरभी सिन्हा यांच्या पुनर्नियुक्तीबाबत ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीने सेबीला कळवले आहे की, “डॉ सिन्हा यांना 5 वर्ष कालावधीसाठी ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या गैर कार्यकारी स्वतंत्र संचालक श्रेणीत अतिरिक्त संचालक पदावर पुनर्नियुक्त करण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price today on 06 May 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x