24 November 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Brightcom Group Share Price | 14 रुपयांचा ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर पुन्हा तुफान तेजीत, 10 दिवसात गुंतवणुकदारांना 45% परतावा दिला

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे शेअर्स आज पुन्हा अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. गुरुवारी ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी 5 टक्के अप्पर सर्किट तोडून 13.67 रुपये किंमत स्पर्श केली होती. मागील 5 दिवसात ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्समध्ये 24 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप लिमिटे कंपनीचे शेअर्स 9.35 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 72 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.80 टक्के वाढीसह 14.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

10 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 दिवसात ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कपनीचे शेअर्स 45 टक्के मजबूत झाले आहेत. तर 28 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 9.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 11 मे 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 13.67 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ब्राइटकॉम ग्रुप कंपनी एकूण बाजार भांडवल 2758 कोटी रुपये आहे.

‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीने मागील दोन वर्षांत आपल्या शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केले होते. ऑगस्ट 2021 मध्ये या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 4 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. कंपनीने प्रत्येक 4 शेअर्सवर गुंतवणूकदारांना 1 बोनस शेअर मोफत दिला होता. मार्च 2022 मध्ये ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीने 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. यात कंपनीने प्रत्येक 3 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत जारी केले होते.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांची ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीमध्ये 34.15 कोटी रुपये गुंतवणूक लागली आहे. ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या प्रवर्तकांनी 18.47 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. उर्वरित भाग भांडवल सार्वजनिक शेअर धारकांनी धारण केले आहेत. दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे 2,50,00,000 शेअर्स म्हणजेच 1.24 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price Today on 12 May 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x