20 April 2025 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Brightcom Group Share Price Today | ब्राईटकॉम ग्रुपचा शेअर 85 टक्के घसरून 14 रुपयांवर आला, सध्याच्या घडामोडीत शेअरचं काय होणार?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price Today | डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटवर धडकले होते. तर आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के घसरणीसह 14.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 20 टक्के कमजोर झाले आहेत. (Brightcom Group Limited)

सेबीने कंपनीवर कठोर कारवाई केल्यामुळे हा स्टॉक सतत लोअर सर्किट हीट करत आहे. या कंपनीने आपल्या आर्थिक निकालात तोटा कमी आणि नफा जास्त दाखवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एवढेच नाही तर कंपनीने आपल्या शेअर होल्डिंग पॅटर्नची ही बरोबर माहिती सेबीला दिली नाही. सेबीला कंपनीच्या बँक खात्यांमध्ये एकूण 1280 कोटी रुपयांचा घोटाळा आढळून आल्याची माहिती मीडिया रिपोर्टवरून मिळत आहे. यासोबतच शेअर बाजार नियामक सेबीने कंपनीच्या प्रवर्तकांच्या शेअर होल्डिंगबाबत कंपनीकरून सविस्तर खुलासा मागवला आहे.

स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीने ‘ब्राइटकॉम समूहा’ ला अनेक प्रश्नांबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली असून कंपनीने यावर आपण कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती दिली आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समधील अनागोंदीमुळे कोरोना काळात कंपनीच्या शेअरची किंमत बेसुमार वाढली आणि गुंतवणूकदारांनी बंपर परतावा कमावला. मात्र मागील एक वर्षभरापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची घसरगुंडी सुरू आहे. या कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 85 टक्के कोसळले आहेत. या दरम्यान शेअरची किंमत 94 रुपयांवरून खाली येऊन 14 रुपयेवर पोहचली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल सध्या 161.06 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price Today on 18 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या