17 April 2025 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

Brightcom Share Price | करोडपती बनवणारा हा शेअर खूप स्वस्त झालाय, 1 दिवसात 12% वाढला, हा स्टॉक खरेदी करणार?

Brightcom Share Price

Brightcom Share Price| चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल कंपन्यांनी जाहीर करायला सुरुवात केली आहे. या कंपन्यांच्या तिमाहीत निकालाचे परिणाम त्यांच्या शेअर्सच्या किमतीवर ही स्पष्टपणे दिसून येत आहे. तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर “ब्राइटकॉम ग्रुप” कंपनीचे शेअर तेजीत धावत सुटले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सनी 12 टक्क्यांची उसळी घेतली होती. 13 नोव्हेंबर 2022 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर करताच कंपनीचे शेअर्स रॉकेटसारखे वर गेले होते.

सोमवारीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर ब्राइटकॉम समूहाचे शेअर्स 12.04 टक्क्यांची वाढीसह 41.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या आधी गेल्या आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र, या कमालीच्या वाढीनंतरही ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स अजूनही आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या 61 टक्के कमजोरीसह ट्रेड करत आहेत.

तिमाही निकलाचे परिणाम :
ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने जारी केलेल्या तिमाही निकालाच्या आकडेवारीनुसार, कंपनीने 320.68 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. हा निव्वळ नफा मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 51.15 टक्के जास्त आहे. या तिमाहीत कंपनीचा एकूण सेल्स 1683.07 कोटीं रुपये होता. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीचा महसूल वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्राहकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे कंपनीचा महसूल अधिक प्रमाणात वाढला आहे. ब्राइटकॉम ग्रुपने तिमाही निकालात म्हंटले आहे की, दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 5 जाहिरात एजन्सी, 16 नवीन थेट जाहिरातदार आणि 7 वृत्तपत्रे त्यांच्या बिझनेस पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. ब्राइटकॉम ग्रुपकंपनी ऑनलाइन आणि डिजिटल मार्केटिंग सेवा क्षेत्रात उद्योग करते.

मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1291 टक्क्यांनी वधारली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 122 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांक किंमत 29.90 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Brightcom Share Price has increased after announcement of profitable Quarterly results on 15 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Brightcom Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या