Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरने एका महिन्यात 74% परतावा दिला, अप्पर सर्किट मुळे पैसा वेगाने वाढवतोय स्वस्त झालेला शेअर
Brightcom Share Price | मागील काही दिवसापासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. अवघ्या 4 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 74.54 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने 5 जून रोजी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आम्ही सेबीला पूर्ण सहकार्य करण्याचे वचन देतो. कंपनी सेबीचे निरीक्षण गांभीर्याने घेत असून कारणे दाखवा नोटीसवर गांभीर्याने विचार करत आहे.
ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने आपल्या उपकंपन्यांचे ताळेबंद उघड केले नसल्याची माहिती मिळताच सेबी कंपनीवर कारवाई केली. यानंतर, ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने त्यांच्या सर्व सहयोगी कंपन्यांचे ताळेबंद त्यांच्या वेबसाइटवर जाहीर केले. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 23.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्राइटकॉमवर सेबीची काय कारवाई होती ? या वर्षाच्या सुरुवातीला , बाजार नियामक सेबीने ब्राइटकॉममध्ये लेखासंबंधी त्रुटी आणि काही गोष्टी उघड न केल्यामुळे कडकपणा दाखवला ब्राईटकॉमच्या नफा – तोटा खात्यात 868 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान दिसून आले नाही . गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने नफा वाढवला असल्याचे सेबीने म्हटले.
कंपनी सेबीच्या रडारवर आली होती
ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर होल्डिंगमध्ये प्रचंड घसरण झाल्याने कंपनी सेबीच्या रडारवर आली होती. 2022 मध्ये जेव्हा अनेक गुंतवणूकदारांनी ट्विटर सेबीला ट्विट करून माहिती दिली की, कंपनीचे अध्यक्ष आणि सह संस्थापक सुरेश कुमार रेड्डी चार LLP मध्ये भागीदार आहेत. या चार एलएलपीमध्ये आराधना कोमोसेल्स, सरिता कोमोसेल्स, कल्पना कोमोसेल्स, शालिनी सेल्स या कंपन्यां सामील आहेत.
एप्रिल 2022 मध्ये या एलएलपी सार्वजनिक शेअर होल्डिंगमधून प्रवर्तक श्रेणीमध्ये स्थलांतरित झाल्याने संतप्त गुंतवणूकदारांनी ट्विट करून सेबीकडे नाराजी जाहीर केली. काही गुंतवणूकदारांनी ट्विट करून माहिती दिली की, कंपनीच्या प्रमोटर्सनी किरकोळ किमतीवर 19 टक्के शेअर्स खुल्या बाजारात विकून टाकले. अचानक कोणताही व्यावसायिक व्यवहार न करता हे प्रवर्तक LLP चे भागीदार बनले.
2021 मध्ये ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ
2021 मध्ये ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली होती. त्यानंतर हा शेअर 3 रुपयांवरून वाढून 117 रुपयेवर पोहचला होता. तथापि आर्थिक अनियमितता उघडकीस आल्यानंतर अवघ्या 16 महिन्यांत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या गुंतवणूकदारांना 90 टक्के नुकसान सहन करावे लागले आहे.
दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील ब्राइटकॉम ग्रुपचे 1.25 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. 9 जून रोजी ब्राइटकॉम कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के अप्पर सर्किटसह 23.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Brightcom Share Price today on 10 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार