22 November 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरची घसरगुंडी सुरू, रोज लोअर सर्किटवर, नेमकं कारण काय? गुंतवणूकदारांनी काय करावे?

Brightcom Share Price

Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून घसरण पहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स पाच टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले होते. (Brightcom Group Share Price)

आज देखील हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 22.98 रुपयांपर्यंत खाली आले होते. तर आज गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी ब्राईट कॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 21.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे, सेबीने दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्यासह 23 जणांवर शेअर्स विकण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरवर जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. SEBI ने एका अंतरिम आदेशात ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या सुरेश कुमार रेड्डी आणि नारायण राजू यांना पुढील सूचना मिळेपर्यंत संचालकपद धारण करण्यास बंदी घातली आहे.

सुरेश कुमार रेड्डी हे ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे प्रवर्तक, अध्यक्ष आणि एमडी म्हणून काम करत होते. तर नारायण राजू कंपनीचे सीएफओ म्हणून काम करत होते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांना तर सेबीने शेअर्स विकण्यावर बंदी घातली आहे.

सेबीच्या या कठोर आदेशामुळे ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीशी संबंधित 25 संस्था आणि व्यक्ती प्रभावित होणार आहेत. ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीने 2021 आणि 2022 मध्ये चार वेळा प्राधान्याच्या आधारावर वॉरंट आणि शेअर जारी केले होते आणि 82 लोकांकडून कंपनीने 867.78 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.

तपासा दरम्यान SEBI ने काही लोकांच्या शेअर्स आणि रकमेचे निरीक्षण केले असता आढळून आले की 245.24 कोटी रुपये मूल्याचे 25,76,50,000 इक्विटी शेअर्स 22 लोकांना वाटप करण्यात आले आहेत. आणि त्यातून कंपनीला फक्त 52.51 कोटी रुपये मिळाले. आणि उर्वरित 192.73 कोटी रुपये कंपनीला मिळालेच नाही. म्हणून सेबीने हे प्रकरण हेराफेरी चे प्रकरण म्हणून हाताळण्याचे ठरवले आहे. आता गुंतवणूकदारांचे लक्ष पुढील कारवाईकडे लागले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Share Price today on 24 August 2023.

हॅशटॅग्स

Brightcom Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x