5 November 2024 8:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

BYJU'S Banned Shahrukh Khan Ads | शाहरुख खानवर आधारित सर्व जाहिराती BYJU'S ने थांबवल्या

BYJU'S Banned Shahrukh Khan Ads

मुंबई, 0९ ऑक्टोबर | ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफवर मोठा फटका बसला आहे. ऑनलाइन लर्निंग ॲप BYJU’S (बायजूस) ने शाहरुख खानवर आधारित असलेल्या आपल्या सर्व जाहिराती थांबवण्याचा (BYJU’S Banned Shahrukh Khan Ads) निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर ज्या जाहिरातींचे शाहरुखसोबत बुकिंग झाले होते त्या देखील रिलीज करणार नाही असा निर्णय कंपनीने घेतला आहे.

BYJU’S Banned Shahrukh Khan Ads. Byju’s has paused its association with Bollywood actor Shah Rukh Khan following his son Aryan Khan’s arrest in a drug case in Mumbai :

शाहरुखच्या सर्वात मोठ्या स्पॉन्सर्ड डील्सपैकी बायजूस एक होता. या ब्रँडिंगच्या माध्यमातून शाहरुखला वार्षिक 3 ते 4 कोटी रुपये मिळत होते. 2017 पासूनच तो या ब्रँडचा चेहरा होता. या व्यतिरिक्त शाहरुख खानकडे ICICI बँक, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टूरिज्म, ह्युंदे यासारखे इतर 40 मोठे ब्रँड आहेत.

शाहरुख खान बायजूस ॲपमध्ये लोकांना आपल्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी आणि ट्युशनसाठी बायजूस किती महत्वाचे आहे याचे सल्ले देत असतो. परंतु, शाहरुखच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाली. तेव्हापासून सोशल मीडियावर अभिनेत्याला ट्रोल केले जात आहे. यामध्ये अभिनेत्यासह त्याने एंडोर्स केलेल्या ब्रँड्सला सुद्धा लक्ष्य केले जात आहे. अशात ब्रँड्सला नकारात्मक प्रसिद्धीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच लहान मुलांच्या अभ्यासासाठी असलेले बायजूस शाहरुखचा चेहरा वापरून काय संदेश देत आहे? असा सवाल केला जात आहे.

बायजू रविंद्रन यांचे एडुटेक स्टार्टअप बायजूस डेकाकॉर्न क्लबमध्ये सामिल आहे. या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू 10 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. त्यामुळेच याला डेकाकॉर्न म्हटले जाते. कुठल्याही ब्रँडसाठी हे विशेषण मिळवणे खूप सन्मानजनक आहे. सिलिकॉन व्हॅलीच्या गुंतवणूकदार एनालिस्ट मेरी मीकर्स यांच्या कंपनीने बायजूसध्ये गुंतवणूक केली आहे. 10.5 अब्ज डॉलर अर्थात 79,409 कोटी हा खूप मोठा आकडा आहे. अशात शाहरुखच्या कुप्रसिद्धीवरून कंपनीला धोका पत्कारणे महागात पडू शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: BYJU’S Banned Shahrukh Khan Ads after son Aryan Khan arrest.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x