Caplin Point Laboratories Share | या 25 पैशाच्या फार्मा कंपनीच्या शेअरने आयुष्य बदललं, अल्प गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा दिला
Caplin Point Laboratories Share | ‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ या फार्मा कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 273,000 टक्के नफा कमावून दिला आहे. या कालावधीत ‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ कंपनीचे शेअर्स 25 पैशांवरून वाढून 600 रुपयांवर पोहचले आहेत. लॅटिन अमेरिका, आफ्रिकेत कंपनीने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्याच वेळी अमेरिका आणि युरोपियन युनियनसारख्या बाजारपेठांमध्ये कंपनीने आपला व्यवसाय विस्तार केला आहे.
‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ कंपनी विविध प्रकारचे मलम, क्रीम आणि इतर औषध बनवण्याचे काम करते. कॅपलिन पॉइट लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 856 रुपये होती. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी ‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के घसरणीसह 678.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
21 फेब्रुवारी 2003 रोजी ‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ कंपनीचे शेअर्स 25 पैशांवर ट्रेड करत होते. या काळात ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावून कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 27 कोटी रुपये झाले आहे. 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 684 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 273920 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 21 फेब्रुवारी 2003 रोजी कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 27.36 कोटी रुपये झाले असते.
10 वर्षात दिला 5300 टक्के परतावा :
कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5359 टक्के नफा कमावून दिला आहे. 17 मे 2013 रोजी या फार्मा कंपनीचे शेअर्स 12.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनीचे शेअर्स 9 मे 2023 रोजी 684 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 17 मे 2013 रोजी कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 54.50 लाख रुपये झाले असते.
‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ कंपनीने डिसेंबर 2022 च्या तिमाहीन 59 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर याच तिमाहीत कंपनीने 130.60 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5223 कोटी रुपये आहे. त्याच वेळी या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 7066 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Caplin Point Laboratories Share price today on 10 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल