5 November 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

CBDT Information | 2 बांधकाम समूहांच्या IT धाडीत १८४ कोटीची बेहिशेबी संपत्ती जप्त CBDT कडून माहिती

CBDT Information

मुंबई, 16 ऑक्टोबर | आयकर विभागाने मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांवर तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही नातेवाइकांवर टाकलेल्या छाप्यांत सुमारे १८४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी (CBDT Information) संपत्तीची माहिती बाहेर आली असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शुक्रवारी जाहीर केले.

CBDT Information. CBDT on Friday said that raids by the Income Tax Department on two real estate groups in Mumbai and some relatives of Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar had uncovered assets worth about Rs 184 crore :

PTI’ने वरिष्ठ नेता म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा उल्लेख सूत्रांच्या आधारे केला आहे. प्राप्तीकर खात्याने ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, बारामती, गोवा व जयपूर येथील बांधकाम क्षेत्रातील दोन समूहांच्या १० ठिकाणांवर छापे घालण्यात आले होते. त्यात १८४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. या कारवाईत २.१३ कोटी रुपये बेहिशेबी रोख व ४.३२ कोटी रुपयांचे दागिने ताब्यात घेण्यात आले.

या छाप्यांत २.१३ कोटींची बेहिशेबी संपत्ती, ४.३२ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या छाप्यांत काही कंपन्यांच्या बेहिशेबी आणि संशयास्पद व्यवहाराचीही माहिती बाहेर आली आहे. बनावट शेअर प्रीमियम, कर्ज आणि इतर काही सेवांसाठी अवास्तव आगाऊ रक्कम देऊन करार करून ही बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचे निदर्शनास येत असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: CBDT Information about uncovered assets worth about 184 crore raids on two real estate groups.

हॅशटॅग्स

#IncomeTax(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x