25 April 2025 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल
x

CEAT Share Price | मल्टिबॅगर सिएट टायर शेअर सुसाट वेगात पैसे वाढवतोय, मागील 1 महिन्यात 24 टक्के परतावा दिला, खरेदी करावा का?

Ceat Share Price

CEAT Share Price | सिएट या टायर निर्माता कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वादळी तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सिएट कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 2510.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

काल स्टॉकने 2,181.69 रुपये ही आपली जुनी विक्रमी उच्चांक किंमत तोडली आहे. 25 मे 2023 रोजी सिएट कंपनीच्या स्टॉकने उच्चांक किंमत स्पर्श केली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 2498.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील ट्रेडिंग सेशनच्या तुलनेत शेअरची किंमत 405.80 रुपये किंवा 19.39 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के घसरणीसह 2,447.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सिएट कंपनीच्या बाजार भांडवलाने आता 10,000 कोटीची पातळी ओलांडली आहे. इंट्रा – डे ट्रेडमध्ये सिएट कंपनीचे बाजार भांडवल 10,200 कोटी रुपयेच्या पार गेले आहेत. सीएट कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये सिएट कंपनीचे शेअर्स 17.77 टक्के वाढले आहेत.

मागील एका महिन्यात सिएट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 24.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 118.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे शेअरची किंमत 50.49 टक्के वाढली आहे.

सीएट कंपनीने मार्च 2023 तिमाहीत 10,000 कोटी रुपये महसूल टप्पा ओलांडला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने11,263 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सीएट कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये महसूल वाढीत 21 टक्क्यांची नोंद केली आहे. CEAT ही RPG एंटरप्रायझेसची प्रमुख कंपनी असून भारतातील दिग्गज टायर निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते. जागतिक बाजारपेठेत या कंपनीचे टायर 2-3 चाकी, SUV वाहने, युटिलिटी, कमर्शियल वाहनांमध्ये वापरले जातात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | CEAT Share Price today on 07 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

CEAT Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony