18 November 2024 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

Cellecor Gadgets Share Price | मार्ग श्रीमंतीचा! नुकताच लिस्टेड झालेला सेलकोर गॅजेट्स शेअर जबरदस्त तेजीत, आजही अप्पर सर्किटवर

Cellecor Gadgets Share Price

Cellecor Gadgets Share Price | सेलकोर गॅजेट्स कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धमाकेदार एंट्री मारली आहे. या कंपनीचे शेअर्स बाजारात 92 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. शेअर बाजारात सेलकोर गॅजेट्स कंपनीचे 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 96.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीच्या IPO मध्ये सेलकोर गॅजेट्स कंपनीच्या शेअर्सची किंमत बँड 87-92 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स एनएसई एसएमई या एक्सचेंजवर सूचीबद्ध झाले होते. सेलकोर गॅजेट्स कंपनीचे शेअर्स 25 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आले होते. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी सेलकोर गॅजेट्स स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 101.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सेलकोर गॅजेट्स या कंपनीच्या IPO ला 116 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. सेलकोर गॅजेट्स कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 124.08 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. त्याच वेळी, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 176.54 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 57.58 पट सबस्क्राइब झाला होता. सेलकोर गॅजेट्स कंपनीच्या आयपीओपूर्वी कंपनीच्या प्रवर्तकांनी 69.95 टक्के भाग भांडवल धारण केले होते. IPO नंतर प्रवर्तकांची हिस्सेदारी आता 51.54 टक्केवर आली आहे.

सेलकोर गॅजेट्स कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदार किमान 1200 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. सेलकोर गॅजेट्स IPO 15 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचा आयपीओ 20 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये फक्त 1 लॉटसाठी बोली लावू शकत होते.

या कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉट अंतर्गत 1200 शेअर्स ठेवले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 110,400 रुपये जमा करावे लागले होते. सेलकोर गॅजेट्स कंपनीच्या IPO चा आकार 50.77 कोटी रुपये होता. हा IPO शेअर बाजारात NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cellecor Gadgets Share Price 29 September 2023.

हॅशटॅग्स

Cellecor Gadgets Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x